जिल्हयात 10 ऑक्टोबर पर्यंत मनाई आदेश


अकोला,दि.27(जिमाका)- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित  राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अक्टचे 22 अन्वये दि. 10 ऑक्टोंबर च्या मध्यरात्री पर्यंत लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशान्वये  घातक शस्त्र, दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेण्यास, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश अंत्ययात्रा,धर्मिक विधी,धार्मिक मिरवणूक,लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी,सार्वजनिक करमणूकीची सिनेमागृहे,रंगमंच इत्यादी बाबींकरिता लागू होणार नाहीत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :