विधानसभा निवडणूक २०१९ खर्च दर निश्चिती सभा व राजकीय पक्ष प्रतिनिधींना प्रशिक्षण


अकोला, दि.२३ (जिमाका)- विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या कामकाजास वेग आला असून  निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांकडून वापरण्यात येणाऱ्या बाबींचे दर निश्चित करण्यासाठी आज एक बैठक घेण्यात आली. तसेच  राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना खर्च सादर करण्याबाबतचे प्रशिक्षण ही देण्यात आले.
 आज सकाळी खर्चाचे दर निश्चित करण्याबाबतची सभा आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे पार पडली . या सभेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजेश खवले, कोषागार अधिकारी माधव झुंजारे, लेखापरीक्षक सोनी व अन्य अधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये राजकीय पक्षाचे प्रतिनिधींना निवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच त्यांना खर्च विषयक पुस्तिका देखील पुरविण्यात आली. याशिवाय निवडणूक प्रचारार्थ वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे किमान दर काय असावे? याबाबतची चर्चा करून साहित्याचे अंतिम दर निश्चित करण्यात आले.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ