सैन्यदल अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण

          अकोला,दि.21(जिमाका)- भारतीय सैन्यदल, नौदल, व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Bord (SSB) या परीक्षेची पुर्व तयारी करून घेणेसाठी  छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतीसाठी दि.10 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत SSB कोर्स क्र.51 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अकोला येथे मंगळवार दि.ऑक्टोबर रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे.
मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग,पुणे यांची वेबसाईटwww.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लिक करून त्यामधील उपलब्ध Check List यांचे अवलोकन करून त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून (किंवा प्रिंट कार्यालयाकडुन घ्यावी) ते पुर्ण भरुन आणावेत.
आवश्यक पात्रता:-
 कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथ्वा नॅशनल डिफंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण, त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र, एनसीसी "C" सर्टिफिकेट 'A' किंवा 'B' ग्रेड मध्ये  उत्तीर्ण, एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरची एसएसबी साठी शिफारस, टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी.मुलाखतीसाठी कॉल लेटर.University Entry Schme साठी एसएसबी कॉल लेटर किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र.0253-2451031 आणि 0253-2451032 असुन कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,आर.ओ. लठाड (प्रभारी) अकोला यांनी केले आहे.
                                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ