स्वच्छता ही सेवा प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन करा- जिल्हाधिकारी पापळकर
अकोला,दि.1६(जिमाका)- जिल्ह्यात सध्या ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहिम (दि.११
सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर) राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. या कालावधीत
जिल्ह्यातील प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनावर भर देऊन प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन
करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
‘स्वच्छता
ही सेवा’, या अभियानाच्या नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस,निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड,
नगरपालिका प्रशासनाच्या जिल्हा प्रशासन अधिकारी श्रीमती टवलारे आदी अधिकारी
उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील महानगर पालिका, सर्व नगरपालिका यांनी आपापल्या
कार्यक्षेत्रात प्लास्टीकचा एकल उपयोग थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच
त्यामाध्यमातून प्लास्टीक कचऱ्याचे संकलन करुन प्लास्टीक कचऱ्याचे निर्मूलन करावे,
असे निर्देश दिले.
यावेळी माहिती देण्यात आली की,
जिल्ह्यात कचरा निर्मूलनासाठी व स्वच्छतेसंदर्भात विविध माध्यमातून
जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कचरा
वेचकांचेम समुहांसोबत महापालिका व नगरपालिका यंत्रणांनी समन्वय साधून कचरा संकलन,
वर्गिकरण व प्रक्रिया याबाबत उपाययोजना सुरु केल्या आहेत. जिल्हाधिकारी पापळकर
यांनी सांगितले की, प्लास्टीक कचरा निर्मिती जेथून होते त्या व्यावसायिकांचे
प्रबोधन करुन त्याच ठिकाणी हा कचरा संकलित करण्याच्या उपाययोजना करा.
जिल्ह्यात विविध उपायांच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा ही मोहिम राबवून
जिल्ह्याला स्वच्छतेत अव्वल राखावे,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना
दिले. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी निर्देश दिले की, शहरातील विविध समुदायात जनजागृती करावी, या उपक्रमाअंतर्गत दि. २ ऑक्टोबर रोजी प्लास्टिक मुक्त
दिवस पाळण्यात येणार आहे. प्लास्टीकला
पर्याय म्हणून महिल बचत गटांमार्फत कापडी पिशव्या तयार करण्याच्या उपक्रमाला चालना द्यावी, सर्व शासकीय कार्यालयातील एकल प्लास्टीक वापर
बंद करावा,असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा