पुरग्रस्तांना मदतीसाठी गणेशोत्सव मंडळांनी दानपेटी ठेवण्याचे धर्मदाय कार्यालयाचे आवाहन
अकोला,दि.05(जिमाका)- गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिका-यांनी गणेशोत्सव
मंडळाच्या मंडपात कोल्हापुर,
सातारा, सांगली या भागात झालेल्या महापुरामधील बाधित पुरग्रस्तांना मदत मिळावी या हेतुने एक दानपेटी
ठेवावी असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय तथा धर्मादाय उपायुक्त़ कार्यालय
अकोला सर्व गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय तथा धर्मादाय उप आयुक्त़ कार्यालय अकोला विभाग
अंतर्गत जिल्हयामधील सार्वजनिक गणेशोत्सव़
मंडळाचे पदाधिकारी यांची सभा दि.04 रोजी धर्मादाय
उपआयुक्त़ अकोला यांच्या कार्यालयात घेण्यात
आली. त्या सभेत सर्व पदाधिकाऱ्यांना अशा सुचना दिल्यात. गणेशोत्स़व मंडळाचे मंडपात अशाप्रकारच्या
दानपेटीत जमा होणारी रक्कम़ ही कोल्हापुर,
सातारा, सांगली भागातील बाधित पुरग्रस्तांना
देण्यात यावी. याबाबतीत सार्वजनिक गणेशोत्सव़ मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी सकारात्म़क
प्रतिसाद दिला असुन पुरग्रस्तांच्या मदतीकरीता एक वेगळी दानपेटी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला व सार्वजनिक
गणेशोत्सव़ मंडळ यांचे संयुक्त़ विद्यमाने गणेशोत्सव़ मंडळाचे मंडपात राहणार असुन सर्व
भाविक भक्तांनी पुरग्रस्तांचे मदतीकरीता सढळ हाताने रक्कम़ दानपेटीत जमा करावी असे
आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय तथा धर्मादाय उप आयुक्त़ कार्यालय अकोला यांचे
मार्फत करण्यात येत आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा