पत्रपरिषदःविधानसभा निवडणूक २०१९ निर्भय, निष्पक्ष निवडणूकांसाठी यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


अकोला,दि.२१(जिमाका)-भारत निवडणुक आयोगाने आज आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे, त्यासोबतच तात्‍काळ  प्रभावाने निवडणूक आदर्श आचारसंहिता लागु करण्‍यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाने निवडणुक पुर्व तयारी केली असुन अकोला जिल्ह्यात निर्भय, निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले,   राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, निलेश अपार, अतुल दोड तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित माध्यमप्रतिनिधींना  निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्‍या कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील  विधानसभा मतदारसंघा करीता निवडणुकीचा कार्यक्रम सांगण्यात आला.
कार्यक्रम पुढील प्रमाणे-
निवडणुकीची अधिसुचना प्रसिद्ध करण्‍याचा व नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा दिनांक
शुक्रवार दि. 27/09/2019
नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचा अंतिम दिनांक
शुक्रवार दि.04/10/2019
नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचा दिनांक
शनिवार दि.05/10/2019
उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक
सोमवार दि.07/10/2019
मतदानाचा दिनांक
सोमवार दि. 21/10/2019
मतमोजणीचा दिनांक
गुरुवार दि.24/10/2019
           
मतदारांची संख्याः-
दिनांक 31/08/2019 रोजी प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदार यादीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदारांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
अ.क्र.
विधानसभा मतदार संघ
एकुण मतदान केंद्रांची संख्‍या
पुरुष
महीला
इतर
एकुण
एकुण मतदारांची संख्‍या
सेवा मतदार
एकुण मतदार
पुरुष
महीला
एकुण
२८ अकोट
331
150604
134234
5
284843
730
16
746
285589
२९ बाळापुर
336
153425
141061
0
294486
909
16
925
295411
३० अकोला
पश्चिम
300
168297
162848
16
331161
286
9
295
331456
३१ अकोला पुर्व
350
176218
167205
18
343441
562
12
574
344015
३२ मुर्तिजापुर
386
163637
156516
7
320160
613
10
623
320783

एकुण
1703
812181
761864
46
1574091
3100
63
3163
1577254

            या विधानसभा निवडणुकीकरीता नियुक्त निवडणुक निर्णय अधिकारी व त्यांचे संपर्क  याप्रमाणे-
निवडणुक निर्णय अधिकारी यांचे नाव व पदनाम
दुरध्‍वनी क्रमांक
मोबाईल क्रमांक
ई-मेल
रामदास सिद्धभट्टी
उप विभागीय अधिकारी, अकोट
07258-222674
9420499666
sdo.akot@rediffmail.com
रमेश पवार
उप विभागीय अधिकारी, बाळापुर
07257-232133
7774928028
sdo.balapur@rediffmail.com
गजानन सुरंजे
 उप जिल्‍हाधिकारी, महसुल
0724-2426214
8275049620
dcrakola@rediffmail.com
निलेश अपार
उप विभागीय अधिकारी,अकोला
0724-2435336
7588832989
sdo.akola@rediffmail.com
अभयसिंह मोहिते
उप विभागीय अधिकारी, मुर्तिजापुर
07256-243472
8453454545
sdo.murtizapur@gmail.com

                        निवडणुक मुक्‍त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्‍यासाठी मतदारांमध्‍ये जनजागृतीपर (स्‍वीप) कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येत आहे.कोणत्‍याही अपप्रचाराला किंवा आमीषाला बळी न पडता स्‍वतःच्‍या विवेक बुद्धिने मतदान करावे असे मतदारांना आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
तसेच जिल्ह्यातील शस्‍त्र परवानाधारकांना त्‍यांचेकडील शस्‍त्र जवळच्‍या पोलीस स्‍टेशन मध्‍ये जमा करणे बाबत निर्देश देण्‍यात आले असुन कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने पोलीस प्रशासनामार्फत पोलीस बल तैनात ठेवण्‍यात आले आहे. अवैध दारु भट्टी व अवैध धंदे याबाबत धाडसत्राव्‍दारे प्रतिबंधात्‍मक कार्यवाही करण्‍यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक गावकर यांनी दिली. नागरीकांना सुद्धा कोणतीही आक्षेपार्ह बाब निदर्शनास आल्‍यास त्‍याकरीता CVIGIL अॅप व्‍दारे तक्रार करण्‍याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी यांचे स्‍तरावर भरारी पथक, व्‍हीडीओ पाहणी पथक, स्थिर पथक, खर्च निरीक्षण पथक ई. स्‍थापन करण्‍यात आलेले आहेत.
                        निवडणूक आदर्श आचारसंहितेच्‍या अनुषंगाने निवडणुक आयोगाने निर्गमित केलेल्‍या सुचनेनुसार शासकीय/निमशासकीय कार्यालय आणि परिसरातुन भिंतीवरील लेखन, पोस्‍टर्स/कट आऊटस/होर्डीग्‍स/बॅनर्स/झेंडे इत्‍यादी त्‍वरीत काढुन टाकणे निर्देश दिले आहेत.त्‍या प्रमाणे शासकीय/निमशासकीय कार्यालय आणि परिसरातुन भिंतीवरील लेखन, पोस्‍टर्स/कट आऊटस/होर्डीग्‍स/बॅनर्स/झेंडे इत्‍यादी काढण्‍यात बाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच खाजगी मालमत्‍ते वरील सर्व अनधिकृत राजकीय जाहीरातीसुद्धा आचारसंहिता लागू झाल्‍यापासुन ७२ तासांचे आत काढुन टाकण्‍याबाबत संबंधीत प्राधिकरणांना निर्देशित करण्‍यात आले आहे. त्‍याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्‍यात येत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीप उपक्रमाबाबत माहिती दिली व मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :