निलक्रांती योजनेतंर्गत शोभिवंत मत्स्य टाकीचे वितरण



            अकोला,दि.05(जिमाका)-  केंद्र शासनाच्या निलक्रांती योजनेतंर्गत मत्स्य व्यवसाय विभागातर्फे  जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना तसेच इतर सार्वजनिक स्थळी बसविण्याकरीता मत्स्य टाकीचे वितरण करण्यात येते.
            या  योजनेतंर्गत जिल्हापरिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मत्स्य टाकी लावण्यात आली.  मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे  मत्स्य  टाकीच्या  खालील बाजुस शासनाच्या मत्स्य  व्यवसायाच्या  विविध योजनांची  माहिती  प्रदर्शीत करण्यात आली आहे. यामुळे या योजनांची जनजागृती  होणार आहे. या मत्स्य टाकीसह फलकाचे औपचारीकरीत्या उदद्याटन  करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक ताराणीया तसेच मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश  भारती यांची प्रमुख उपस्थिती होती.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :