मतदान, मतमोजणीच्या कालावधीत मद्यविक्री बंद

अकोला,दि.24(जिमाका)-  जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात दि. 21 ऑक्टोंबर रोजी मतदान व दि. 24 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणुक निर्भय व खुल्या वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाची वेळ  संपण्यापुर्वी 48 तास अगोदर, तसेच मतमोजणीच्या दिवशी संपुर्ण अकोला जिल्ह्यात व शहरात मद्यविक्रीस मनाईचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र  पापळकर यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 

टिप्पण्या