शालेय सेपक टाकरा स्पर्धा 19 रोजी
अकोला,दि.12(जिमाका)- जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने
आयोजित जिल्हास्तर शालेय सेपक टाकरा जिल्हा क्षेत्र व अकोला मनपा क्षेत्र जिल्हास्तर 14,17,19 वर्षाआतील मुले/मुली स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि.19 रोजी स्व. वसंत देसाई स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल,
अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे. या
स्पर्धात सहभागी होणाऱ्या शैक्षणीक संस्थांनी सदर खेळात आपला प्रवेश निश्चित
करावा, ऑनलाईन नोंदणी अंतिम तारीख बुधवार दि.18 आहे.
जिल्ह्यातील सर्व
व्यवस्थापनाअंतर्गत येणाऱ्या शैक्षणीक संस्थांनी नोंद घेवुन आपले खेळाडु नियोजित
ठिकाणी उपस्थित ठेवावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन
वेळेत संपर्क साधावा,असे आवाहनही करण्यात आले
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा