13 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात जागरुकता अभियान राबविणार




            अकोला,दि.03(जिमाका)- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग अभियान , सक्रिय क्षयरोग शोध मोहिम  व असंसर्गजन्य रोग  प्रतिबंध जागरूकता अभियान 13 ते 28 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. राजकुमार चव्हाण , सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम.एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी तुळशीराम काळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मोरे यांची प्रमुख उपस्थिती  होती.
समाजातील  निदान न झालेले कुष्ठरुग्ण , नविन कुष्ठरुग्ण  शोधुन काढणे त्यांच्यावर औषध उपचार करणे व समाजात कुष्ठरोगा विषयी जनजागृती करणे  ,  समाजातील निदानाअभावी वंचित राहिलेले क्षयरुग्ण  शोधुन काढून त्यांच्यावर औषधोपचार करणे  तसेच प्रशिक्षीत पथकाव्दारे गृहभेट देवुन क्षयरोगाची लक्षणे असलेले व्यक्ती शोधुन काढणे , संशयीत क्षयरुग्णाचे थुंकी नमुने व एक्सरे तपासणी करणे  आणि समाजात क्षयरोगा विषयी जनजागृती करणे तसेच असंसर्गजन्य रोगाबद्दल जनजागृती करणे , समाजातील 30 व अधिक वर्ष वयोगटातील  लोकांची तपासणी करून उच्च रक्तदाब , मधुमेह व कर्करोग या रोगांबाबत सर्वेक्षण करणे यासाठी  हे अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व घरांचे तसेच शहरी भागातील निवडक भागांचे सर्वेक्षण  घरोघरी भेटी देवून करण्यात येणार आहे. घरामधील सर्व सदस्यांची कुष्ठरोग , क्षयरोग व असंसर्गजन्य आजारासाठी शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असुन यासाठी करावयाच्या नियोजनासाठी  आजची सभा आयोजीत करण्यात आली होती. आरोग्य कर्मचा-यांच्या मदतीने हे अभियान यशस्वी करण्यात येणार आहे.
                                                                      00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :