साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी कार्यक्रम


                    अकोला,दि.12(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्य सांस्कृतिक/सामाजिक कार्यक्रम दि. 7 रोजी प्रमिलाताई ओक सभागृह येथे संपन्न झाला.
             अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवस्थापक गं. रा. श्रीरामवार हे होते.  यावेळी अण्णाभाऊ साठे पुरस्कार   प्राप्त  वामणराव भिस,  रामदास तायडे, रामचंद्र गायकवाड,  आणि  श्रीमती सुनंदा चांदणे यांचा सन्मान चिन्ह देवून  सत्कार करण्यात आला.  तसेच समाजातील गरीब होतकरू  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
            अण्णाभाऊ यांच्या सामाजिक वैचारीक   समाज उपयोगी  विचारसरणी बाबत सतीष कसबे,  उस्मानाबाद  यांनी   आपले विचार प्रकट केले. प्रास्ताविक सिद्धेश मांजरेकर  यांनी, सुत्रसंचालन  भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन नरवाडे (वाशिम) यांनी केले.  तसेच  कार्यक्रमास  श्री. गौड,  श्री. डाबेराव  सामाजिक कार्यकर्ते श्री मानवतकर, श्री. अमोल वानखडे,  श्री. दांडगे,  गजानन तायडे, बाळासाहेब तायडे, अनिल वाघमारे , सुरेश जाधव यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ