जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
अकोला,दि.21(जिमाका)- भारतीय मौसम विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार
दि.२१ ते २५ दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यात
पाऊस, विजा कोसळणे, अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात पूर्णा
प्रकल्पाचे नऊ दरवाजे १५ सेमी ने उघडण्यात आले आहे. त्यातून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत केला जात आहे. अन्य नद्यांनाही पूर आला आहे. पोपटखेड वान
प्रकल्पातून , अमरावती जिल्ह्यात चंद्रभागा,
शहानूर या प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय
म्हणून जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी नाल्याच्या काठावरील गावांनी व तेथील
क्षेत्रिय यंत्रणांनी सतर्क रहावे, असे जिल्हाधिकारी अकोला यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा