अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ; मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी



            अकोला,दि.३०(जिमाका)- मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी स्थानिक तहसिल / उपविभागीय अधिकारी/ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली मतदार नोंदणी दि. १  ऑक्टोंबर ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत करावी असे,  सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक मतदार संघ तथा जिल्हाधिकारी अकोला जितेंद्र पापाळकर  यांनी आवाहन केले आहे.
 शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त तर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे संबंधित जिल्ह्यातील सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील. निवडणूक आयोगाने जाहीर केलेला शिक्षक मतदारसंघ मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे
दि. ऑक्टोंबर २०१९ रोजी सुचना प्रसिद्धी, दि.१५२५ ऑक्टोबर रोजी वर्तमान पत्रातील सुचनेची  अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुर्नप्रसिद्धी,दावे व हरकती स्विकारणे दि.६ नोव्हेंबर पर्यं, दि. १९ नोव्हेंबर पर्यंत यादी हस्तलिखित तयार करुन प्रारुप  मतदान याद्यांची छपाई, दि. २३ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्धी, दि.२३ नोव्हेंबर  पासून ते डिसेंबर  र्यंत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.२६ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढून पुरवणी याद्यांची छपाई , दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदार याद्यांची अंतीम प्रसिद्धी.
अकोला जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना यासंदर्भात पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पात्र शिक्षकांनी विहित नमुन्यात मतदार नोंदणी करावी. ही मतदार यादी नव्याने तयार होत असल्यामुळे सर्व पात्र शिक्षकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता स्थानिक तहसिल / उपविभागीय अधिकारी/ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली मतदार नोंदणी दि. १  ऑक्टोंबर ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत करावी असे,  सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक मतदार संघ तथा जिल्हाधिकारी अकोला जितेंद्र पापाळकर  यांनी  अकोला जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघातील सर्व मतदारांना कळविले आहे.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :