जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
अकोला,दि.१८(जिमाका)- जवाहर नवोदय
विद्यालयात सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेचा
ऑन लाईन अर्ज भरण्यासाठी सोमवार दि. ३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी ही मुदत रविवार दि.१५ पर्यंत होती. ती
आता दि.३० पर्यंत करण्यात आली आहे. फेज -२ ज्यांनी पूर्ण केले नसेल त्यांना ते करण्यास गुरुवार दि.३ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली
आहे. अर्ज भरण्यासाठी www.navodaya.gov.in, www.jnvakola.org.in या संकेतस्थळावर www.nvsadmissionclasssix.in या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या
प्राचार्यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा