खाजगी ऑटोरिक्षा परवाना नोंदणीस मुदतवाढ



        अकोला,दि.04(जिमाका)-  आटोरिक्षा धारकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्रं.एमव्हीआर-0815/प्र.क्र.387/परि-2/दि.22 सप्टेंबर 2017 अन्वये शासनाने विहीत केलेले अतिरिक्त परवाना शुल्क अदा करून  खाजगी संवर्गात नोंदणी करतांना  अथवा  सध्याच्या परवान्यावर  बदली वाहन म्हणून  परिवहन संवर्गात नोंदणी करण्यास दि. 31 मार्च 2018 पर्यंत अंतिम मुदत दिली होती.
            आता शासनाने दि. 19 ऑगस्ट 2019 चे शासन निर्णयान्वये खाजगी संवर्गात नोंदणीकृत असणारी ऑटोरिक्षा नविन परवान्यावर परिवहन संवर्गात नोंदणी करण्यास अथवा  सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणून परिवहन संवर्गात नोंदणी करण्यास दि.31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
            त्या अनुषंगाने खाजगी संवर्गात  नोंदणी झालेली ऑटोरिक्षा परिवहन संवर्गात नोंदणी करण्यात यावे, असे आवाहन  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :