महात्मा गांधी जयंतीदिनी (२ऑक्टो.) विशेष लोकअदालत


        अकोला,दि.२६(जिमाका)-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुधवार दि.२ ऑक्टोबर रोजी पराक्राम्य अभिलेख अधिनियम (कलम १३८ )प्रकरणांसाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात सकाळी साडेदहा वाजल्यापासून या लोकअदालतीच्या कामकाजाला सुरुवात होईल. तरी ज्यांची पराक्राम्य अभिलेख अधिनियम कलम १३८ ची प्रकरणे प्रलंबित असतील यांनी या लोकअदालतीत आपली  प्रकरणे दाखल करावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.एस. बोस यांनी केले आहे. आपली प्रकरणे दाखल करण्यासाठी तालुका विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा संपर्क- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला, जिल्हा न्यायालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, अकोला-४४४००१. दूरध्वनी ०७२४-२४१०१४५.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :