पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात 240 नवीन तक्रारी प्राप्त
अकोला, दि.16 (जिमाका)- आजच्या जनता दरबारात राज्याचे गृह(शहरे), नगरविकास,
विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य
विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित
पाटील यांनी विविध विभागांच्या
एकूण 240 तक्रारींबाबतची निवेदने स्विकारली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष
प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस ,अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी
उपजिल्हाधिकारी राम लठाड, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. आज
प्राप्त विभागनिहाय तक्रारींची संख्या याप्रमाणे-
महसूल विभाग 89, पोलीस विभाग 15, जिल्हा परिषद 47,. जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्था 06, मनपा 30, जिल्हा अग्रणी बॅंक 05,
विज वितरण कंपनी 12, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख 06, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 07,
सार्वजनिक बांधकाम विभाग- 05, जिल्हा शल्य चिकित्सक- 03, दुय्यम निबंधक कार्यालय- 02, जिल्हा विपनन
अधिकारी- 02, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना -02, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण- 02 तर राज्य
उत्पादन शुल्क -01 , राज्य परिवहन महामंडळ – 01,
कामगार कल्याण आयुक्त 01, पुरातन
विभाग -01, औद्यागीक प्रशिक्षण संस्था – 01, उपसंचालक आरोग्य विभाग – 01, भविष्य
निर्वाह निधी पेंन्श्न कार्यालय- 01 अशा एकूण 240 तक्रारी अर्ज प्राप्त झाले. या
अर्जांचे निराकरण करण्याच्या सुचना यावेळी ना. डॉ. पाटील यांनी संबंधित विभागांना
दिल्या.
जनता दरबाराच्या पुर्वी आज सकाळी राज्याचे गृह(शहरे), नगरविकास,
विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य
विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित
पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी
पुढीलप्रमाणे माहिती दिली.
जनता तक्रार निवारण दिन विषयक माहितीः-
राज्याचे गृह(शहरे), नगरविकास,
विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी
सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्य मंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी
जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जनता तक्रार निवारण दिन हा उपक्रम 30
ऑक्टोबर 2017 रोजी सुरु केला. दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी हा
उपक्रम राबविण्यात येतो.
या
उपक्रमात आतापर्यंत 6544 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 6036 तक्रारींचे निराकरण झाले
आहे. 508 तक्रारी या अनुपालन स्तरावर आहेत. एकंदर तक्रार निवारणाचे प्रमाण हे 92.24
टक्के इतके आहे.
हा उपक्रम दर महिन्याला न चुकता
(निवडणूक आचारसंहितेचा अपवाद वगळता) राबविण्यात येत आहे.
विभागनिहाय प्राप्त तक्रारींची संख्या
या प्रमाणे-
महसूल विभागाच्या 2152 तक्रारी प्राप्त
झाल्या 1953 तक्रारींचे निराकरण झाले तर 199 तक्रारी प्रलंबित आहेत.
जिल्हा परिषदेच्या 1560 तक्रारी होत्या
त्यातील 1452 तक्रारींचे निराकरण झाले तर 108 तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.
महानगरपालिकेच्या 609 तक्रारी प्राप्त
झाल्या असून 594 तक्रारींचे निराकरण झाले. 15 प्रलंबित आहेत.
पोलीस अधिक्षकांकडील 575 तक्रारी प्राप्त असून 535 तक्रारींचे
निराकरण झाले असुन 40 प्रलंबित आहे.
विज वितरण कंपनीशी संबंधित 268 पैकी 245 तक्रारींचे
निराकरण झाले असून 23 प्रलंबित आहेत.
सहकार विभागाच्या 258 पैकी 248 तक्रारींचे निराकरण
झाले असून 10 प्रलंबित आहेत.
जिल्हा अग्रणी बॅंकेकडील 175 पैकी 171 तक्रारींचे
निराकरण झाले.
भूमि अभिलेख कार्यालयाकडील 152 पैकी 133 तक्रारींचे
निराकरण झाले आहे तर 19 तक्रारी प्रलंबित आहेत. कृषि विभागाशी संबंधित 203 पैकी
196 तक्रारींचे निराकरण झाले आहे सात
तक्रारी प्रलंबित आहेत.
जातपडताळणी कार्यालयाकडील 47 पैकी 40 तक्रारींचे
निराकरण झाले आहे.
अन्य विभागांशी संबंधितही आलेल्या तक्रारींपैकी
बहुतांश निराकरण झाले आहे.
अशा एकूण 6544 पैकी 6036 तक्रारींचे निराकरण झाले
आहे. 508 अनुपालन स्तरावर आहेत.
प्लास्टीक मुक्तीची शपथ
जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा ही मोहिम
राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणुन प्लास्टीक मुक्तीची शपथ यावेळी
घेण्यात आली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,
पोलीस अधिक्षक अमोघ गावकर ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा
आयुक्त संजय कापडणीस ,अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम
लठाड इत्यादी मान्यवरांनी व उपस्थितांनी
ही शपथ घेतली.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा