मतदारांच्या सुविधेसाठी हेल्पलाईन (1950) कार्यान्वित


अकोला,दि.11(जिमाका)- मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार, आगामी  विधानसभा  सार्वत्रिक  निवडणूक  2019 च्या  अनुषंगाने राज्य संपर्क केंद्राप्रमाणेच  जिल्हा स्तरावर Voter Helpline म्हणून 1950 हा एकच  दुरध्वनी  क्रमांक असलेले  जिल्हा संपर्क केंद्र कार्यरत  करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील सामान्य निवडणूक शाखेत जिल्हास्तरावर  Voter Helpline म्हणून  1950  हा दुरध्वनी  क्रमांक असलेले मतदार  सहायता केंद्र स्थापना  करण्यात आले असुन  जिल्ह्यातील नागरीकांना  मतदार यादी विषयी काही तक्रार किंवा माहिती आवश्यक असल्यास व मतदार यादीत नावांबाबत विचारणा  करावयाची असल्यास त्यांनी  कार्यालयीन वेळेत  Toll Free   दुरध्वनी  क्रमांक  1950 वर संपर्क  साधुन  त्यांना आवश्यक माहिती/मदत प्राप्त करून  घ्यावी,असे आवाहन करण्यात  आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :