जिल्हास्तरीय शालेय हॅण्डबॉल, व्हॉलीबॉल व कुडो स्पर्धेचे आयोजन


         अकोला,दि.04(जिमाका)-  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर शालेय हॅण्डबॉल, व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजन पावसामुळे पुढे  ढकलण्यात आले होते तसेच शालेय कुडो 14,17,19 वर्षाआतील मुले/मुली वयोगटाच्या स्पर्धा आयोजनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नव्हत्या त्याअनुषंगाने अकोला जिल्हा क्षेत्र जिल्हास्तर शालेय हॅण्डबॉल, व्हॉलीबॉल अकोला मनपा जिल्हा क्षेत्र शालेय कुडो स्पर्धेच्या तारखा या प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.
अकोला जिल्हा क्षेत्र जिल्हास्तर शालेय हॅण्डबॉल व्हॉलीबॉल 14, 17, 19 वर्षाआतील मुले/मुली सोमवारी (दि.9) रोजी स्व. वसंत देसाई स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल, अकोला येथे  आयोजित करण्यात येणार आहेत.
अकोला महानगर क्षेत्र अकोला जिल्हा क्षेत्र जिल्हास्तर शालेय कुडो 14,17,19 वर्षाआतील मुले / मुली रविवारी व सोमवारी (दि.8 व 9) या कालावधीत स्व. वसंत देसाई स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल, अकोला येथे  आयोजित करण्यात येणार आहेत. कुडो खेळाची ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख शनिवारी (दि.7) आहे.
शालेय हॅण्डबॉल, व्हॉलीबॉल 14,17,19 वर्षाआतील मुले / मुली जिल्हास्तर शालेय कुडो 14,17,19 वर्षाआतील मुले / मुली स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ज्या शैक्षणीक संस्थांनी या खेळात आपला प्रवेश निश्चित केला आहे. जिल्हयातील अशा शैक्षणीक संस्थांनी नोंद घेवुन स्पर्धा कार्यक्रमानुसार खेळाडु नियोजित ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत व्यवस्था करावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा.    
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :