राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पंच व मार्गदर्शकांची नावे मागविली


            अकोला,दि.11(जिमाका)- भारतीय  शालेय खेळ  महासंघाच्या निर्देशानुसार, 65 व्या राष्ट्रीय  शालेय क्रीडा स्पर्धा सन 2019-20 करीता विविध खेळाचे पात्र पंच  व क्रीडा मार्गदर्शकांची नावे पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे.  त्यानुसार पात्र पंच  व क्रीडा  मार्गदर्श  सन  2019-20 वर्षाकरीता  विविध स्पर्धा करीता पाठविण्यात येईल आवश्यक पात्रता याप्रमाणे-
            क्रीडा  मार्गदर्शक – एन.आय.एस. सर्टिफिकेट  कोर्स झालेला असणे  आवश्यक आहे  व शाळेमध्ये नोकरी असणे आवश्यक आहे. किंवा राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र.
            पंच- आंतरराष्ट्रीय  पंच  असल्याबाबतचे  प्रमाणपत्र किंवा  राष्ट्रीय पंच परिक्षा  प्रमाणपत्र (Level1,2,3)
 याप्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या  पंच व क्रीडा मार्गदर्शक यांनी आवश्यक प्रमाणपत्रासह कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :