पिक कापणी प्रयोगास ग्रामस्तरीय समितीस उपस्थितीचे आवाहन


        अकोला,दि.27(जिमाका)- खरीप हंगाम सन-2019-20 अंतर्गत अकोला उपविभागातील तालुकानिहाय ,  गावनिहाय पिक कापणी प्रयोगाचे  आयोजन  केले आहे. त्या अनुषंगाने  पिक कापणी प्रयोगाचे वेळी   ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांनी  उपस्थित रहावे असे आवाहन  उपविभागीय  कृषि अधिकारी   अजय कुलकर्णी  यांनी  केले. 
            पिक कापणी प्रयोगाचे  क्षेत्रीय काम मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक या अनुक्रमे महसुल , कृषि व ग्रामविकास विभागाच्या  क्षेत्रीय  कर्मचाऱ्यांकडे  सोपविण्यात आले आहे. या प्रयोजनार्थ ग्रामस्तरावर कृषि विभागाच्या  शासननिर्णयानुसार  समिती गठण करण्यात आली असुन  या समितीमध्ये  संबधीत गावाचे  सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठी यांना समाविष्ट केलेले आहे. तथापि, पिक कापणी प्रयोग  हा कृषि विभाग,  ग्रामसेवक  विभाग आणि महसुल विभाग  यांच्या सहभागाने  पार पाडणे अपेक्षित असल्याने प्रयोग कृषि  विभागाचा  असल्यास  या समितीचा अध्यक्ष मंडळ कृषि अधिकारी  असेल. प्रयोग ग्रामविकास विभागातील समितीकडे असल्यास  कृषि  विस्तार अधिकारी  आणि महसुल विभागाकडे असेल तर मंडळ अधिकारी ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष राहतील. परंतु, ग्रामविकास  विभाग व महसुल विभागाच्या  अख्यत्यारितील पिक कापणी पिक कापणी प्रयोग  ग्रामसमित्यामध्ये कृषि  सहाय्‌यक/कृषि पर्यवेक्षक/ मंडळ कृषि अधिकारी यापैकी एकाचा  समावेश असेल या  मितीमार्फत पिक कापणी प्रयोगाचे काम हाताळण्यात येईल व यासाठी सदर समिती  जबाबदार असेल. त्या अनुषंगाने खरीप हंगाम  सन 2019-20  अंतर्गत संबधित ग्रामस्तरीय समितीने उपस्थित राहणे आवश्यक आहे. या पिक कापणी प्रयोगाच्या निर्ष्कषावर वेगवेगळ्या  पिकांची उत्पादकता समजत असते. या उत्पादकतेवर शासनाची आयात निर्यात धोरणे, बाजारभाव विमा योजनेअंतर्गत  घ्यावयाचे  निर्णय ठरत असतात. त्यामुळे पि  कापणीचे  प्रयोग  अत्यंत  महत्वाचे  सू  ग्रामस्तरीय समितीने  आपल्या गावात होणाऱ्या  पिक प्रयोगाच्या  वेळी समक्ष  हजर राहावे  असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :