प्लंबिग प्रशिक्षण केंद्र उद्घाटन कौशल्य विकासातून घडवा परिवर्तन-पालकमंत्री डॉ. रणजित पाटील






अकोला,दि.1(जिमाका)-   औद्योगिक प्रशिक्षण संस्थानी अंगिभूत कौशल्याला अत्याधुनिक प्रशिक्षणाची जोड द्यावी. त्यामुळे स्वयंरोजगारास चालना मिळून युवकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन होईल. त्यांना जीवनात प्रतिष्ठा प्राप्त होईल,असे प्रतिपादन राज्याचे गृह(शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदिय कार्य,  माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील
अकोला येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत  आज बॉश इंडीया या संस्थेच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय  मानकांचे प्लंबिंगचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज ना. डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी पी.एन. जयस्वाल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. जे.बंडगर, बॉश कंपनीचे प्रकाश पाटील, अजय आखरे आदी उपस्थित होते. यावेळी ना. डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते फित कापून प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन  करण्यात आले. याठिकाणी प्रशिक्षण केंद्राच्या कार्यपद्धती व पिंपरी चिंचवड येथील प्रशिक्षण केंद्राची माहिती सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आली.
कालानुरुप बदलत्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार करावा. कालबाह्य व्यवसाय अभ्यासक्रम  बदलवून किंवा बंद करुन नवीन अत्याधुनिक व उद्योगांच्या गरजेनुसार व्यवसाय प्रशिक्षण सुरु करावे, यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा, असे ही ना. डॉ. पाटील यांनी सांगितले.
या प्रशिक्षण केंद्रात तीन महिने मुदतीचा अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय मानकांचा प्लंबिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. त्यास बॉश इंडिया या कंपनीचे सहकार्य असून  एका बॅच मध्ये २५ विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर या प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीची संधीही उपलब्ध होऊ शकेल तसेच त्यांना स्वयंरोजगारही  करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी पी.एन. जयस्वाल  यांनी केले तर सूत्रसंचालन पंकज नारे यांनी   व आभारप्रदर्शन उपप्राचार्य एस. आर. ठोकरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व कर्मचारी- प्रशिक्षक वृंद उपस्थित होते.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :