हरितगृह/शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांची नोंदणी


          अकोला,दि.20(जिमाका)-  एकात्मिक  फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत सन 2019-20 करीता हरितगृह/ शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा  पुरवठादारांची जिल्हा स्तरावर  नोंदणी  करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर  नोंदणी करण्यासाठी  इच्छुक सेवा  पुरवठादाराकडुन आवश्यक कागदपत्रासह   शुक्रवार, दि.27 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात  आले आहे. ही नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  कार्यालयात करावी. र्जासोबत,विहित नमुन्यातील  हमीपत्र, जी.एस.टी नोंदणी व शॉप क्ट प्रमाणपत्र , कमीतकमी दोन वर्षाचे   अनुभव  प्रमाणपत्र, मागील दोन वर्षाचे  लेखापालाने प्रमाणित केलेला  आर्थ‍िक   ताळेबंद  आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.  अधिक माहितीसाठी  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , मुर्तिजापुर  रोड ,जकात नाक्याजवळ, अकोला  येथील फलोत्पादन  शाखेशी संपर्क  साधावा,असे  आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ