जिल्हा युवा पुरस्कार; अर्ज मागविले
अकोला,दि.१८(जिमाका)- युवा कार्यक्रम
व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने ग्रामिण भागात युवक कल्याण, सामाजिक व
ग्रामिण विकासाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा संस्थांना जिल्हा युवा पुरस्कार दिले जातात. त्यासाठी इच्छुक नोंदणीकृत युवा संस्थाकडून
प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीतील कार्याचा विचार केला जाईल. जिल्हास्तरावर निवड
झालेली संस्था राज्यस्तरावर, राज्यस्तरावरुन राष्ट्रीयस्तरावर याप्रमाणे संस्थेचा
प्रस्ताव पाठविला जाईल. जिल्हास्तरीय पुरस्कार २५ हजार रुपये व प्रमाणपत्र, राज्यस्तरीय
पुरस्कार एक लक्ष रुपये व प्रमाणपत्र,
राष्ट्रीय पुरस्कार प्रथम पाच लक्ष
रुपये, द्वितीय तीन लक्ष रुपये, तृतीय दोन लक्ष रुपये व मानपत्र या स्वरुपाचे
असतील. पुरस्कारासाठी इच्छुक युवा
मंडळांनी नमुना अर्ज नेहरु युवा केंद्र, वसंत
देसाई स्टेडियम, दुसरा माळा, अकोला येथील कार्यालयातून सोमवार दि.२३ पर्यंत न्यावा
व पूर्ण भरलेला अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह
सोमवार दि.३० पर्यंत सादर करावा, असे
आवाहन युवा समन्वयक शरद साळुंखे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा