खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी; कामगारांसाठी दक्षता कक्ष स्थापन


        अकोला,दि.२५(जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी  २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी- कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत असे सहाय्यक कामगार आयुक्त रा.दे. गुल्हाणे यांनी कळविले आहे. यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात दक्षता कक्ष स्थापन  करण्यात आला असल्याचेही कळविण्यात आले आहे.
            यात अकोला जिल्हा क्षेत्रातील दुकाने, निवासी हॉटेल्स,  खाद्यगृह, नाट्यगृह, अन्यगृह,  व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य आस्तापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स,  मॉल्स, रिटेल्स आदी आस्थापनांवरील कामगार, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे कामगार आपल्या निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत  पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास दोन ते तीन तासाची सुटी देता येईल. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी मालकांनी घेणे आवश्यक असेल. यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अकोला येथे दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला असून  कोणाला या संदर्भात काहीही तक्रार असल्यास संबंधित कामगारांनी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ