जिल्हा स्तरीय तंबाखु नियंत्रण समितीची सभा संपन्न
अकोला,दि.13(जिमाका)- राष्ट्रीय तंबाखु
नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा समन्वय व जिल्हा
स्तरीय तंबाखु नियंत्रण समिती सभा
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे दालनात बुधवार (दि.11) रोजी संपन्न झाली.
या सभेमध्ये
जिल्ह्यात प्रभावीपणे तंबाखु नियंत्रण कार्यक्रम
राबविण्याकरीता जिल्हाधिकारी यांनी गावपातळी ते जिल्हापातळी पर्यंत
जिल्ह्यातील सर्व तंबाखु विक्री केंद्रे व
पान टप-यांवर चेतावणी दर्शक कर्करोग चित्ररूपी सुचना व 18 वर्षा आतील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकणे
कायदेने गुन्हा आहे असे फलक दर्शनीय ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाची जनजागृतीची सुरूवात ही
शाळा, महाविद्यालयांपासुन होत असल्याने कोटपा कायदानुसार शैक्षणिक संस्थेच्या
100 यार्ड अंतरापर्यंत तंबाखु विक्री केंद्रे व पान टप-यां हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी संबंधीत विभागांना
दिले.या सभेमध्ये पालकमंत्री यांच्या मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञ
सदस्यांनी जिल्ह्यामध्ये तंबाखु
नियंत्रणाबाबतचे आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मानसशास्त्रज्ञ प्रा.
डॉ. राजेंद्र पाटील ,डॉ. दुष्यंत देशपांडे, आरोग्य व तंबाखु नियंत्रण क्षेत्रात
काम करणा-या संस्थेचे डॉ. योगेश शाहु, प्रा. मोहन खडसे, प्रा. संकेत काळे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन एल.जी. राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.
एम.डी. राठोड ,मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.
फारूक शेख, पोलीस उपनिरीक्षक सी.एम. वाघ, गिता अवचार आदींची उपस्थिती होती.
जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण यांच्या
मार्गदर्शनात पीपीटी प्रेझेन्टेंशन
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण
कार्यक्रमाचे डॉ. एम.डी. राठोड ,डॉ.
प्रीती कोगदे धम्मसेन शिरसाट व जे.बी. अवघड यांनी पीसीपीएनडीटी या कार्यक्रमाविषयी उपस्थित सदस्यांना माहिती
दिली.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा