विधानसभा निवडणूक- 2019 निवडणूक निरीक्षक संदिप लाकरा यांनी घेतला खर्च विषयक आढावा




अकोला,दि.30 (जिमाका)-  शासकीय धान्य गोदाम खदान अकोला येथे निवडणुक  निरीक्षक (खर्च)         संदिप लाकरा यांचे अध्यक्षतेखाली काल (रविवार दि.29) पार पडली.  या बैठकीत  निवडणूक खर्चा विषयी  तसेच आदर्शआचार संहितेच्या काटेकोर पालनाविषयी त्यांनी आढावा घेतला.
यावेळी 28, अकोट, 29 बाळापुर,30 अकोला पश्चिम या विधानसभा  मतदार  संघातील आचारसंहिता अंमलबजावणी  नियुक्त फिरते पथक, स्थिर पथक, व्हिडिओ सर्व्हेक्षण  पथक, व्हिडिओ पाहणी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनाही त्यांनी  मार्गदर्शनपर सुचना  केल्या.निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या खर्चाबाबतचा अहवाल खर्च पथकास सादर करावा, खर्चावर  नियंत्रक ठेवण्याबाबत व मर्यादेपेक्षा  जास्त खर्च  निदर्शनास आल्यास  निवडणूक आयोगाचे सुचनांनुसार  योग्य कार्यवाही करण्याचे  निर्देश त्यांनी दिले. याकामी कोणत्याही  पथकातील  अधिकारी कर्मचारी यांनी टाळाटाळ अथवा हयगय केल्यास त्यांचे विरूद्ध  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस 28- अकोटचे निवडणूक निर्णय अधिकारी रामदास सिध्दभट्टी, 29- बाळापुर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार 30- पश्चिम अकोला चे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन सुरंजे,  मुख्य लेखा वित्त अधिकारी  एस.बी. सोनी , जिल्हा कोषागार अधिकारी एम.बी. झुंजारे, सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक प्रसन्न बाबु यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ