श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील रहदारीत बदल


अकोला, दि.09 (जिमाका)- श्री गणेश विसर्जन मिरवणूकांना वाहतुकीचा व्यत्यय होऊ नये यासाठी  अकोला- अकोट मार्ग व अकोला शहरातील मिरवणूक मार्गावरील रहदारीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
अकोला- अकोट मार्गावरील रहदारी गुरूवार  दि.12 च्या सकाळी 6 वाजेपासून ते  दि.13 रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत तर अकोला शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतुक  दि. 12 चे सकाळी 6  ते 13  रोजीचे सकाळी  6 पर्यंत  बदल करण्यात आला आहे. तर अकोला पारस फाटा ते बाळापुर मार्गावरील वाहतुक  दि. 12 रोजी दुपारी १२ ते  दि.13 चे सकाळी 12 वाजे पर्यंत या कालावधीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
करण्यात आलेले बदल याप्रमाणे-
अकोला-अकोट राज्य महामार्गावरील वाहतुक
अकोला बसस्थानक   रेल्वेस्टेशन चौक , आपातापा चौक- गांधीग्राम मार्गे अकोट कडे जाणारी वाहतूक व अकोट ते अकोला कडे याच मार्गाने येणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अकोला बसस्थानक- अशोक वाटीका चौक – नेहरू पार्क – हुतात्मा चौक- भगतसिंग चौक- वाशिम बायपास- शेगाव टी पॉईंट- गायगाव- निंबा फाटा- देवरी फाटा- अकोट तसेच अकोट ते अकोला येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.
अकोला पारस फाटा- बाळापूर  महामार्गावरील वाहतुक
अकोला बसस्थानक पारस फाटा- बाळापुरकडे तसेच बाळापूर ते अकोला कडे याच मार्गाने येणारी वाहतूक  अकोला -  पारस फाटा – हायवे टॅप कार्यालय कडुन बाळापूर कडे जाणारी व येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल. तसेच खामगांव – पारस फाटा- बाळापूर- पातुरकडे जाणारी व येणारी वाहतुक खामगांव – पारस फाटा- अकोला (वाशिम बायपास चौक) – पातुरकडे जाणारी तसेच पातुरकडून बाळापूरकडे येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.
अकोला शहरातील मार्गावरील रहदारीत बदल
डाबकी रोड जुने शहर- श्रीवास्तव चौक-विठ्ठल मंदिर- अलका बॅटरी चौक- जयहिंद चौक- कोतवाली चौक- गांधी चौक- अकोला बसस्थानक  तसेच डाबकी रोड जुने शहर ते भिमनगर चौक दगडीपुल मार्गे मामा बेकरी- अकोट स्टँड – रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहतुकीसाठी  डाबकी रोस्ड- जुने शहर- भांडपुरा चौक- पोळा चौक- किल्ला चौक- हरिहर पेठ- वाशिम बायपास चौक- राष्ट्रीय महामार्ग ६ ने लक्स्झरी स्टॅंड- जेल चौक- अशोक वाटीका चौक ते अकोला बसस्थानक या मार्गाने वळविण्यात आली आहे.
अकोला बसस्थानक- गांधी चौक- कोतवाली चौक- जयहिंद चौक- डाबकी रोड तसेच पोळा चौक- हरीहरपेठ कडे जाणारी वाहतुक ही अकोला बसस्थानक अशोक वाटीका चौक- नेहरू पार्क चौक- हुतात्मा चौक- जेल  चौक- लक्झरी स्टॅंड- वाशिम बायपास चौक- हरिहर पेठ- किल्ला चौक- भांडपुरा चौक- जुने शहर- डाबकी रोड या मार्गाने वळविण्यात आली आहे.
रेल्वे ओव्हर ब्रीज- अकोट स्टॅंड- टिळक रोड मार्गे- बियाणी चौक- कोतवाली चौक-लक्झरी बस स्टॅंड- वाशिम बायपास कडे जाणारी वाहतुक ही रेल्वे ओव्हर ब्रीज- रेल्वे स्टेशन चौक- अग्रसेन चौक- टॉवर चौक- धिंग्रा चौक- अशोक वाटीका-  नेहरु पार्क चौक- हुतात्मा चौक- भगतसिंग चौक- लक्झरी बस स्टँड वाशिम बायपासकडे या मार्गे वळविण्यात आली आहे.
अकोट स्टँड- सुभाष चौक- ताजनापेठ- गांधी चौककडे जाणारी – येणारी वाहतुक ही  अकोट स्टँड चौक – दामले चौक- अग्रेसन चौक- टावर चौक बस स्टँड चौक – गांधी चौक मार्गे वळविण्यात आली आहे.  000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :