राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा;आजपासून प्रारंभ


            अकोला,दि.24(जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला  यांचे  संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय  शालेय बॅडमिंटन स्पर्धांचा प्रारंभ बुधवार (दि.25) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुल , वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे होणार आहे.   
            या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर राहणार असुन अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष  प्रसाद राहणार आहे.  महाबिजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गांवकर , महानगरपालीकेचे  आयुक्त  संजय कापडणीस , श्री शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  प्राप्त  नाजुकराव पखाले,  शत्रुघ्न बिरकड,  जिल्हा क्रीडा  परिषदचे  सदस्य   जावेद अली यांची  विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला क्रीडाप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे उपसंचालक प्रतिभा देशमुख व  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :