जिल्ह्यात आजपासून (दि.१३) कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य रुग्ण शोध मोहिम


अकोला,दि.12(जिमाका)- जिल्ह्यात कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य रोगांच्या रुग्णांची शोध मोहिम सर्वेक्षण शुक्रवार दि.१३ पासून राबविण्यात येणार आहे.
यासंदर्भात सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा(कुष्ठरोग) यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या माहिती पत्रकानुसार, जिल्ह्यात कुष्ठरोग शोध व  उपचार मोहिम राबविण्यात आली होती.  यावर्षी  या मोहिमेमध्ये  क्षयरोग व  असंसर्गजन्य  रोगाचा  समावेश  करण्यात आलेला असुन संयुक्त कुष्ठरोग  शोध  अभियान (LCDC), सक्रिय  क्षयरुग्ण  शोध मोहिम (ACF) व  असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान (NCD) 2019-20 आपल्या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेमध्ये  ग्रामीण  भागाचे  संपुर्ण   व शहरी भागातील 30 टक्के लोकसंख्येचे  घरोघर सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरीता आशा व  स्वयंसेवकाव्दारे दरारोज ग्रामीण भागात 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे  सर्व्हेक्षण  दिनांक 13 ते 28 सप्टेंबर या कालावधीत करतील.  सर्व्हेक्षणामध्ये  आढळलेल्या संशयित रुग्णांची तपासणी ग्रामीण  भागात वैद्यकीय  अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरी भागात वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण  रूग्णालय यांचे मार्फत करण्यात येणार आहे.
            कुष्ठरोगाची संभाव्य लक्षणे- अंगावर न खाजणारा, न दुखणारा बधीर चट्टा, जाड व दुखरी मज्जा , तेलकट व चकाकणारी त्वचा  व अंगावरील गाठी, ई.,
क्षयरोगाची संभाव्य लक्षणे-  दोन आठवड्यापेक्षा जास्त ताप  व खोकला,  थुंकीतुन  रक्त पडणे, भुक न लागणे,वजनात घट,  मानेवर गाठी येणे, इ.
असंसर्गजन्य रोगाची लक्षणे- झोप न येणे, जास्त चिंता करणे, जेवण जास्त करणे, तहान जास्त लागणे, वारंवार लघवी येणे, दोन आठवड्यापासुन तोंड येणे,  तोंडामध्ये जखम होणे, स्तनामध्ये गाठ  तयार  होणे, योनी मार्गातुन लाल व पांढरे पाणी जाणे, ओटीपोटामध्ये दुखणे आदी कर्करोगाची  लक्षणे असुन  तपासणी  करुण घेणे आवश्यक आहे.
            या मोहिमेचा  उद्देश हा समाजातील लपुन राहिलेले कुष्ठरूग्ण , क्षयरुग्ण व असंसर्गजन्य रोगाचे रुग्ण  शोधुन त्यांना   उपचाराखाली आणणे हा आहे. तरी आपल्या  घरी येणाऱ्या  आशा व स्वयंसेवक यांना सहकार्य करून  घरातील सर्व सदस्यांची  तपासणी  करून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा(कुष्ठरोग) यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :