ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था इमारतीचे भूमिपूजन:प्रशिक्षणातून मिळावी स्वयंरोजगाराची दिशा- जिल्हाधिकारी पापळकर


          अकोला,दि.12(जिमाका)- ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून  जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची दिशा प्राप्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी येथे बुधवारी (दि.११) व्यक्त केला.
 येथील  ग्रामीण विकास मंत्रालय पुरस्कृत व सेंट्रल बँक ऑफ इंडिया संचालित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते बुधवारी (दि.११) करण्यात आले. येथील सिव्हिल लाईन्स भागात महिला बालकल्याण कार्यालयाच्याजवळ या इमारतीचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया, विभागीय व्यवस्थापक विद्याधर पेडणेकर,संचालक जी.एन.नेतनकर, मुख्य  प्रबंधक सलिल सिंह, सुनिल पाण्डेय,  नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक शरद वाळके, ग्रामिण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक  अनिल राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भुमिपूजन करुन कोनशिला अनावरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या इमारतीचे काम वर्षभरात पुर्ण करुन येत्या वर्षाच्या (सन २०२०) महात्मा गांधी जयंतीला या इमारतीचे लोकार्पण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक जी.एन.नेतनकर यांनी तर सूत्रसंचालन प्रशिक्षक अनिल राऊत यांनी केले व सुनिल पाण्डेय यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरसेटी व सेंट्रल बॅंकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :