पर्यटकांना धरणे,पाटबंधारे,लघुविभाग प्रकल्प या ठिकाणी प्रवेश निशिध्द
अकोला,दि.13(जिमाका)- जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी
635.10 मि.मी पाऊस झाला आहे तसेच मोठे,
मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये पाणीसाठा जमा झाला आहे. पोपटखेड, घुंगशी,
शहापुर या प्रकल्पाचे ठिकाणी गणेश विसर्जन , देवी विसर्जनाच कार्यक्रम होतात. तसेच या प्रकल्प क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी जातात. यापुर्वी जिल्ह्यातील
अनेक प्रकल्पाचे ठिकाणी व्यक्ती बुडुन मृत झाल्याच्या घटना झाल्या आहेत.
जिल्ह्यात दोन मोठे, पाच मध्यम व 33 लघु
पाटबंधारे आहेत. सध्दस्थितीत
प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला असुन पुढील काळात हा जलसाठा आणखी
वाढण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाचे ठिकाणी
पर्यटकांना प्रवेश निशिध्द करण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये गणेश विसर्जन, देवी
विसर्जन यावर सुध्दा निर्बंध घालण्यात आहे,असे
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
कळविले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा