अकोट तालुक्यातील सहकारी संस्थांच्या संचालक व पदाधिका-यांची रविवारी (दि.15) कार्यशाळा
अकोला,दि.13(जिमाका)- जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्था यांच्या वतीने अकोट तालुक्यातील सेवा , विकास सहकारी संस्थांच्या संचालक व
पदाधिका-यांच्या कार्यशाळेचे आयोजन रविवार (दि.15) रोजी दुपारी 12 ते 3 या दरम्यान कृषि
उत्पन्न बाजार समितीचे सभागृह अकोट येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटक
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे करणार असुन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे
राहणार आहेत.
दुपारी 12 ते 12.30 वाजता
नाविन्यपुर्ण दुधपुर्णा योजना या विषयावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हरिप्रसाद
मिश्रा मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12.30 ते 01.30 संचालकाचे हक्क , कर्तव्य व जबाबदा-या या विषयावर सहय्यक निबंधक प्रशासक श्रीकांत खाडे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक बी.जे.काळे
तसेच अटलमहापणन योजनेतंर्गत संस्था सक्षमीकरण या विषयावर दुपारी 2.00 ते 2.30 या
वेळेस जिल्हा व्यवसाय विकास व पणन
व्यवस्थापक गौतम साठे , सहकारी कायद्यातील
97 घटना दुरूस्तीतील बदल या विषयावर
दुपारी 2.30 ते 3.00 या वेळेस
प्रभारी जिल्हा सहकार विकास अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा