माविम व प्रदुषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम प्लास्टिक मुक्तीः विद्यार्थ्यांना कापडी पिशवी वाटप





          अकोला,दि.17(जिमाका)- महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच महिला आर्थ‍िक  विकास महामंडळ  जिल्हा  कार्यालय अकोला यांचे संयुक्त  विद्यमाने आज अकोला महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
 प्लास्टीक निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवून कापडी पिशवीचे  वाटप करण्यात आले.  दैनंदिन  व्यवहारात कापडी पिशवीचा वापर  मोठ्या  प्रमाणात करावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचा प्रथम टप्पा  म्हणुन ज जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांचे हस्ते या कापडी पिशव्यांचे  वाटप करण्यात आले.  यावेळी माविम च्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे,  त्रिशुल घ्यार, शरद शिरसाठ,  बाबाराव अवचार,  योगेश आसालकर  व महाराष्ट्र प्रदुषण  नियंत्रण मंडळाचे  क्षेत्र अधिकारी संतोष कुमार चव्हाण, नंदकिशोर  पाटील  व प्रशांत मेहरे हे उपस्थित होते.
00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ