ईव्हिएम व व्हिव्हिपॅट विषयी प्रशिक्षण



        अकोला,दि.05(जिमाका)-  मा. भारत  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी ईव्हिएम व व्हि.व्हि.पॅटची जनजागृती मोहिम जिल्ह्यातील सर्व   विधानसभा मतदार संघामध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकी करीता नियुक्ती करण्यात आलेल्या तसेच नियुक्ती करण्यात येणा-या विविध चमुना ईव्हिएम व व्हि.व्हि.पॅट विषयीचे प्रशिक्षण व माहिती उपविभागीय अधिकारी तथा  मतदार नोंदणी अधिकारी 31- अकोला पुर्व विधानसभा मतदार संघ  निलेश अपार यांनी  दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन  भवन येथे  करण्यात प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात आले होते.  या प्रशिक्षणामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅटचे प्रदर्शन व  प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच ईव्हिएम व व्हिव्हिपॅट हाताळतांना  निवडणूक  दरम्यान येणा-या अडीअडचणी बद्दल माहिती देण्यात आली.  यावेळी  तहसिलदार  विजय लोखंडे यांनीही मार्गदर्शन केले.  या प्रशिक्षणाला  निवडणूकीच्या कामी नियुक्ती करण्यात आलेले क्षेत्र अधिकारी , तलाठी आदि उपस्थित होते.
                                                                     00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ