आज (दि.5) राजकिय पक्षांचे प्रतिनिधीसाठी ईव्हिएम व व्हिव्हिपॅटची जनजागृती
अकोला,दि.04(जिमाका)- मा. भारत निवडणूक
आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी ईव्हिएम व
व्हि.व्हि.पॅटची जनजागृती मोहिम 31- अकोला पुर्व विधानसभा मतदार संघामध्ये राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने अकोला तालुक्यातील प्रसार माध्यम तसेच राजकिय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याकरीता विशेष शिबीराचे आयोजन 31 अकोला पुर्व विधानसभा
मतदार संघ कार्यालय, नियोजन भवन समोर,
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर
अकोला येथे करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये ईव्हिएम व व्हि.व्हि.पॅटचे
प्रदर्शन व प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार
आहे. या शिबिराकरीता सर्व राजकिय
पक्षांचे प्रतिनिधी यांनी आज गुरूवारी (दि.5) रोजी सकाळी 11 वाजता तसेच
तालुक्यातील सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी शनिवारी (दि.7) रोजी सकाळी 11 वाजता
उपस्थित राहावे, असे मतदार नोंदणी अधिकारी
31- अकोला पुर्व विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा