हर्षल ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे काम बंद, माहिती न देण्याचे आवाहन
अकोला,दि.27(जिमाका)- केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी व
कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, भारत
सरकार यांच्या सुचनेनुसार राज्यस्तरावर
राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही
तयार करण्यासाठी 7
कायद्या अंतर्गत दुकाने व आस्थापना अधिनियम 1960, कंपनी अधिनियम
1956, कारखाना अधिनियम 1948, संस्था नोंदणी अधिनियम 1860, सहकारी संस्था अधिनियम
1960 , खादी व ग्रामीण उद्योग विभाग,
उद्योग संचालनालय(जिल्हा उद्योग केंद्र)
नोंदणीकृत आस्थापनांची क्षेत्रीय पडताळणी
करण्याचे काम अर्थ व सांख्यिकी
संचालनालय, नियोजन विभाग मार्फत अमरावती विभागात अमरावती व
अकोला या जिल्ह्याकरिता हर्षल
ग्रामीण बहु. संस्था या बाह्यस्थ संस्थेमार्फत दि. 1 जुन 2018
पासुन करण्यात येत होते. परंतु सदर
बाह्यस्थ संस्थेचे काम या कार्यालयामार्फत बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे
हर्षल ग्रामीण बहु. संस्था चंद्रपुर यांचे प्रतिनिधी अथवा कर्मचारी यांना कोणत्याही
प्रकारची माहिती देण्यात येऊ नये. तरी
याबाबत 7 कायाद्यांतर्गंत नोंदणीकृत आस्थापना /संस्था /उपक्रम यांनी
नोंद घेण्यात यावी,असे जिल्हा
सांख्यिकी अधिकारी अकोला यांनी कळविले
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा