विषबाधा झालेल्या रुग्णांना आरोग्य सेवेची व्हॅन सेवा उपलब्ध
अकोला,दि.03(जिमाका)- जिल्ह्यामध्ये किटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकरी/ शेतमजुर
यांना विषबाधा होत असल्याच्या घटना
निदर्शनास येत आहेत. किटकनाशके बाधित रुग्णांचा
सर्वप्रथम संपर्क आरोग्य विभागाशी
येत असल्याने ग्रामिण रुग्णालयाचे
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय
अधिकारी यांना प्रथम
प्राध्यान्याने विषबाधा झालेल्या
रूग्णांना आरोग्य सेवेची
108 क्रं. मोबाईल ॲम्बुलन्स सेवा
उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन बाधित रुग्णांवर तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात
शिघ्रगतीने भरती करण्यासाठी आरोग्य सेवेची व्हॅन सेवा उपलब्ध करण्यात आली
आहे,असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
अकोला यांनी कळविले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा