तंबाखुमुक्तीसाठी अधिकाऱ्यांची कार्यशाळा
अकोला,दि.२६(जिमाका)- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था व तंबाखुमुक्त
जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यातील पंचायत समितीचे
गटविकास अधिकारी,केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण आदींची एक दिवसाची कार्यशाळा
नुकतीच पार पडली.
जिल्हा
स्त्री रुग्णालयाच्या कस्तुरबा सभागृहात ही कार्यशाळा जिल्हा तंबाखु नियंत्रण
कक्षामार्फअत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक
प्रजापिता ब्रह्मकुमारीचे राष्ट्रीय
समन्वयक डॉ.सचिन परब हे होते. यावेळी प्रास्ताविक
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले. या कार्यशाळेस शिक्षण अधिकारी वैशाली ठग, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. आरती
कुलवाल आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आयोजनासाठी डॉ. प्रिती कोगदे, समुपदेशक
धम्मसेन शिरसाठ, जे.बी. अवघड आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा