ग्रामपंचायत पोटनिवडणूक; १७ ते १९ मद्यविक्री बंद


अकोला,दि.१५(जिमाका)-  राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जिल्ह्यात ५८ ग्रामपंचायतींमधील ७७ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी  मतदाना आधीचा (बुधवार दि.१७) तसेच मतदानाचा (गुरुवार दि.१८) व मतमोजणीचा (शुक्रवार दि.१९ रोजी मतमोजणी संपेपर्यंत) असे तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका होत आहेत अशा ग्रामपंचायतीतील मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*