पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरास मुर्तिजापूर येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 




अकोला, दि.२९(जिमाका)- मुर्तिजापूर तहसील कार्यालय, एकात्मीक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर शासकीय गोडावून क्रमांक ६ मुर्तिजापूर येथे आज उत्साहात संपन्न झाले. याशिबिरास तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दीप प्रज्वलन व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिष पिंपळे यांचे हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तसेच गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले आदी उपस्थित होते. शिबिरात महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, कृषी विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अभय केंद्र मुर्तिजापूर, संजय गांधी योजना विभाग, पंचायत समिती, एकात्मीक बाल विकास प्रकल्प तेल्हारा, महिला समुपदेशन केंद्र, निवडणूक विभाग,  तालुका विधी सेवा प्राधिकरण इत्यादी विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्याद्वारे योजनांची माहिती महिलांना देण्यात आली. या शिबिरात ५८ तक्रारी प्राप्त झाल्या. दोन तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात आल्या. उर्वरित संबंधित विभागाकडे अग्रेषित करण्यात आल्या. सूत्रसंचालन पी.पी. राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण माहोड, रवि माडके यांनी परिश्रम घेतले.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ