शासकीय बालगृहांमध्ये सांस्कृतिक व बाल क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा




अकोला,दि.2(जिमाका)-  महिला व बालविकास विभागाव्दारे शासकीय बालगृहात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत   दि. 26 ते 28 एप्रिल दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रमातील विविध खेळांमध्ये बालकांनी सहभाग नोंदवुन महोत्सव उत्साहात साजरा केला.

            बालगृहांमधील अनाथ निराधार, निराश्रीत मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण व्हावी यासाठी दि. 26 ते 28 एप्रिल दरम्यान शासकीय बालगृह, सुर्यादय बालगृह, गायत्री बालिकाश्रम येथे या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 100 मिटर धावणे, लांब उडी, कबड्डी, लेझीम, दोरीवरच्या उड्या, कॅरम, नृत्य, योगा इत्यादी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यास्पर्धेत बालगृहातील सर्व प्रवेशितांनी वैयक्तिक व सांघिक खेळ नृत्य, तसेच विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवांचा आनंद घेतला. बालकांसोबत मोठ्यांनी सुध्दा बालस्नेही होवुन बालकांसोबत खेळांचा आनंद घेतला.

            जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास सरसाळे व जिल्हा परिवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल सरकटे, सुनिल लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल सरकटे, सतिश राठोड, नितीन अहीर उपस्थित होते. शासकीय बालगृहाचे जयश्री वाढे, उनंदन शेंडे, गायत्री बालीकाश्रमचे वैशाली भारसाकळे, भाग्यश्री घाटे, सुर्यादय बालगृहाचे शिवराज खंडाळकर, प्रशांत देशमुख, उत्कर्ष शिशुगृहाचे प्रिती दांदळे, उमेश पाटील व बालगृहांतील सर्व कर्मचारी यांनी योगदान दिले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ