औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुर्तिजापूर येथे सोमवारी(दि.15) भरती मेळावा

अकोला,दि.9(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुर्तिजापूर येथे सोमवार दि. 15 मे रोजी सकाळी 9 वा. सुझुकी मोटर्स यांचेवतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यांचा आयटीआय उत्तीर्ण पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.पी. भगत यांनी केले आहे.

भरती मेळाव्याकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संधाता(वेल्डर), मोटरमेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, फिटर, मशिनिष्ट, पेन्टर(जनरल), टुल ॲन्ड डायमेकर हे व्यवसाय उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्ष या वयोगटातील पुरुष उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहावे. सोबत आयटीआय गुणपत्रिका, एसएससी गुणपत्रिका, आधार कार्ड, बायोडाटा व फोटो आणावा. निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीकडून 21 हजार रुपये दरमहा वेतन व सोबत चहा, नास्ता व एक वेळचे जेवन इत्यादी व्यवस्था राहिल. तरी या भरती मेळाव्याचा आयटीआय उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य एस.पी. भगत यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ