पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: 213 उमेदवारांचा सहभाग; 82 जणांची प्राथमिक निवड








अकोला, दि.9(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात भरती प्रक्रियेसाठी 213 उमेदवारांनी सहभाग नोंदविला आला. यामध्ये  निवडप्रक्रियेनंतर 82 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली, अशी माहिती जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.

         जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि  अकोला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 1) ॲबेल इलेक्ट्रो सॉप्ट टेक्नोलॉजीस प्रा.लि. अकोला, 2) बजाज इलेक्ट्रीकल्स चाकण पुणे, 3) अजय पॉली चाकण पुणे, 4) रुचा इंजिनिअरिंग पुणे व औरंगाबाद, 5) एसआयएसी सीकेएच कॅब पुणे, 6) कल्याणी टेक्नोफोर्ज प्रा.लि.कारेगांव पुणे या कंपण्यानी सहभाग नोंदविला. यामध्ये 270 पदांसाठी भरती  प्रक्रिया राबविण्यात आली.  त्यात प्रमुख सहा आस्थापनांनी  सहभाग घेतला. भरती प्रक्रियेसाठी 213  उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. त्यात निवडप्रक्रियेनंतर 82 जणांची सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे  प्राथमिक निवड करण्यात आले.

             उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणीच नोंदणीकरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे गजानन चोपडे, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक रोहित बावस्कर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ