‘पर्यावरण पुरक जीवन पद्धती अभियाना’चा जिल्ह्यात आजपासून प्रारंभ पर्यावरणपूरक पद्धतींचा शेतीत अवलंब करा-तज्ज्ञांचे मार्गदर्शन






अकोला, दि.२२(जिमाका)- पर्यावरण ऱ्हासाने सर्वच क्षेत्रात  मानवाला किंमत चुकवावी लागत आहे. हवामान बदल, अन्न धान्याचे पोषण मूल्य घटक, उत्पादन खर्चात वाढ तसेच जमिन व पाणी यांचे प्रदूषण यासारखे परिणाम मानवाला व प्राण्यांनाही भोगावे लागत आहेत. त्यासाठी शेतीत पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन चांगले येते व पर्यावरणाचे रक्षणही होते, असे मार्गदर्शन मान्यवर कृषी तज्ज्ञांनी केले.

‘पर्यावरणपूरक जीवन पद्धती अभियान’, आजपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. रविवार दि.२८ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून पर्यावरणपूरक जीवन पद्धतीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यानिमित्त गावा गावात कृषी चर्चा, तालुकास्तरीय कार्यशाळा, शेतकरी गटचर्चा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुरली इंगळे यांनी दिली.

जिल्हा नियोजन भवनात यानिमित्त कार्यशाळा पार पडली. त्यात जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, शेतकरी सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे कार्यकारी अधिकारी डॉ. आरीफ शाह, संतोष आळसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मिलिंद गिरी, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. उमेश ठाकरे, डॉ. चारुदत्त ठिपसे आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत डॉ. मिलिंद गिरी यांनी हवामान बदलात कडधान्य पिकाचे महत्त्व, डॉ. उमेश ठाकरे यांनी हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञान वापर, डॉ. चारुदत्त ठिपसे यांनी हवामान अनुकूल  पीक संरक्षण तंत्रज्ञान याविषयांवर मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकातून डॉ. मुरली इंगळे यांनी  अभियानाचा हेतू सांगितला. सूत्रसंचालक आत्माचे मिलिंद जंजाळ यांनी तर आभार प्रदर्शन योगेश देशमुख यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ