महिला बालविकास विभागाचे बालक सर्व्हेक्षण


अकोला
,दि.३(जिमाका)- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग व आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्या आदेशान्वये महिला व बालविकास विभागातर्फे रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे सर्व्हेक्षण सुरु झाले आहे. या सर्व्हेक्षणात बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते.

त्यानुसार जिल्ह्यात  रेल्वे स्टेशन, बस स्थानक , मंदिरे, टॉवर चौक आदी गर्दीच्या व वर्दळीच्या परिसरात ग्रामिण भागात व सर्व तालुक्यात हे सर्व्हेक्षण करण्यात आले. या मोहिमेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी  गिरीश पुसदकर,  बालकल्याण समितीच्या अध्यक्ष  अनिता गुरव, प्रांजली जयस्वाल, डॉ. विनय दांदळे, राजेश देशमुख, ॲड. शीला तोष्णिवाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, पद्माकर सदाशिव, हर्षाली गजभिये, सुनिल सरकटे संरक्षण अधिकारी, सचिन घाटे , योगेंद्र खंडारे, अपर्णा सहारे, नागसेन दामोदर आदी सहभागी झाले. या मोहिमेदरम्यान रस्त्यावर आढळून आलेल्या पाच पैकी चार बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. एका बालिकेस बालिकाश्रमात पाठविण्यात आले.  हे सर्व्हेक्षण सुरु राहणार असून  अशाप्रकारे बेवारस पद्धतीने एकटे फिरणारे बालके आढळल्यास  १०९८ या टोलफ्री क्रमांकावर अथवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांना तात्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

०००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ