जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त उद्या (दि.३१) जनजागृती रॅली, मौखिक कर्करोग तपासणी शिबिर

 अकोला, दि.२९(जिमाका)- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बुधवार दि.३१ रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त  जनजागृती रॅलीचे तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात मौखिक कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचा मार्ग  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – एचडीएफसी चौक- पंचायत समिती- टॉवर चौक- अशोक वाटीका चौक- मार्गे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे समारोप.  या कार्यक्रमास व रॅलीत व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. यानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालयात मौखिक कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना