पाटसुळ ता. अकोट येथील अनुसूचित जाती मुलांच्या निवासी शाळेत प्रवेश सुरु


अकोला,दि. 19 (जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसुल ता. अकोट येथील निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 करिता इयत्ता सहावी ते 10 वीत प्रवेशाकरिता अर्ज मागविण्यात आले आहे. सदर शाळा निवासी स्वरुपात असुन विद्यार्थ्याना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, पुस्तके, गणवेश, संगीत- क्रीडा साहित्य व इतर सोयी- सुविधा पुरविण्यात येईल. तसेच प्रवेश अर्ज शाळेत विनामुल्य उपलब्ध असून सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी पालक, विद्यार्थ्यांनी अनुसूचीत जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, पाटसुळ ता.अकोट  येथे संपर्क साधावा, असे आवाहन अनुसूचीत जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक एस.व्ही. पहुरकर यांनी केले आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज