जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त जनजागृती मेळावा




अकोला, दि.22(जिमाका)-  खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त शनिवार दि. 20 मे रोजी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय ताले यांनी मध्यमाशीबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक करुन दाखविले. तर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नंदा लवाळे यांनी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी खादी ग्रामोद्योगचे पर्यवेक्षक मानसी गाडगीळ, पोलीस निरीक्षक शेळके तसेच मोठया संख्येने शेतकरी वर्ग व महिला शेतकरी उपस्थित होते.  

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना