पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर ;पातूर येथे मंगळवारी (दि.३०)

 


अकोला, दि.२६(जिमाका)-  तहसिल कार्यालय ,पंचायत समिती ,एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पातूर येथे  मंगळवार दि.३० रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

महिलांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांच्या प्रश्नांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक व्हावी यासाठी त्यांना व्हावे यासाठी तालुकास्तरावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान’ शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.३० रोजी श्री संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृह रवींद्र नगर खानापूर रोड पातुर   येथे हे शिबीर होणार आहे, अशी माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी  समाधान राठोड यांनी दिली. या शिबीरात महसुल विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन,नगरपंचायत, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, तालुका विधी सेवा प्राधीकरण, सखी वन स्टॉप सेंटर, महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कौटुंबीक हिंसाचार अधिनियम व इतर विविध विभागाचे स्टॉल असतील व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन  तहसिलदार विजय खेडकर, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर रुद्रकार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान राठोड यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ